मुंबई

Panvel Marathon News : रायगडातील पहिली पूर्ण मॅरेथाॅन 1 डिसेंबर ला पनवेलमध्येमहानगरांचे वैभव जसं पनवेलला येतंय तशा समस्या देखील येतील;आ.प्रशांत ठाकूर यांची सतर्कतेची जाणीव


पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं Panvel Marathon आयोजन पनवेलमध्ये 1डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि संकेतस्थळाचे प्रकाशन आ.प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी 67 वर्षीय धावपटू अजित कंबोज,डाॅ.कल्याणी पाटील,सुरेश रिसबूड, आयोजक प्रफुल वाजे,तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन चे सतीश शेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी आ.प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात , पनवेल हे मुंबई सारख्या महानगराच्या जवळ आले आहे.महानगरातील वैभव पनवेलमध्ये येत आहेत तशा समस्या,अडचणी देखील आपल्याकडे येणार आहेत.त्याला सामोरे जाताना आपण चांगल्या बाबींना आत्मसात करून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मॅरेथॉन स्पर्धेमुळे पनवेलच्या वैभवात भर पडणाफ आहे.अशा या स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. यासोबतच खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याचं गरजेचं असल्याचं प्रशांत ठाकूर म्हणाले. तर ज्येष्ठ धावपटू अजित कंबोज यांनी , जिद्दीने खेळलो तर काहीही अशक्य नाही.पळत रहा आणि आरोग्याला देखील लांब पळवत रहा असा मंत्र देखील कंबोज यांनी दिला.

डॉ. कल्याण पाटील यांनी मॅरेथॉनचं आणि धावण्याचं आरोग्य दृष्टीनं महत्त्व पटवून दिलं. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमार ठाकूर यांनी केलं. दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी करायची असल्यास indiarunning आणि Townscript वर ऑनलाइन पद्धतीनं करता येईल. आगामी काळात या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहेत याची माहिती देखील वेळोवेळी देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0