मुंबई

Panvel Latest News : चित्रकला स्पर्धेत कार्तिकी आंग्रेची चमकदार कामगिरी

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर MLA Prakash Thakur यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जाणिव सामाजिक ट्रस्टने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या चित्रकला स्पर्धेत संपूर्ण नवी मुंबईतून एकूण ६००हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पनवेलमधील कार्तिकी संदीप आंग्रे हिने चौथ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तिला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या वेळी तिचे वडील संदीप आंग्रेही उपस्थित होते. Panvel Latest News

पनवेल शहरातील आगरी समाज हॉल येथे भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ज्युनिअर के.जी. ते पहिली, दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी पर्यंत अशा चार गटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सुमारे ६००हून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल याच ठिकाणी लगेच जाहीर करण्यात आला. त्यात विजेत्याला प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देउन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच – स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांनाही प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन त्यांना प्रोत्साहीत करण्यात आले. Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0