मुंबई

Panvel Health Camp : करंजाडेतील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस साजरा

Panvel Health Camp 200 जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

पनवेल,जितीन शेट्टी : करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रेयांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीरा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 200 जणांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये शुगर लेवल, रक्त गट, दातांची तपासणी, हाडांची ढिसूळता घनता, स्त्रीरोग तंज्ञाकडून तपासणी व मार्गदर्शन, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा करंजाडे येथील 1 ली ते 6 वी पर्यंतच्या विध्यार्थीना वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी करंजाडे येथील जेष्ठ नागरिकांनी देखील वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला यावेळी जेष्ठानी आपली मनोगते व्यक्त केली.


यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर, संदीप भास्कर चव्हाण, योगेश भरत राणे, केतन आंग्रे उमेश भोईर, नीलिमा भगत, हेमा गोतमारे, शशांक पोईपकर, महिला सदस्य व ग्रा.सदस्य यांच्यासह जेष्ठ नागरिक, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्तित होते.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago