Panvel Election Update : यंदा मतदान केंद्रावर मोबाईल लॉकर सोयीमुळे मतदार राजांची झाली चांगलीच सोय
पनवेल जितिन शेट्टी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यावरून दरवर्षी वादंग निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते परंतु यावर्षी निवडणूक आयोगातर्फे मतदान कक्षाबाहेरच मतदारांना आपले मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल लॉकरची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेबाबत मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागरिकांच्या जीवनामध्ये मोबाईल ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे .परंतु मतदान करण्यासाठी जाताना नेहमी पोलीस व मतदारांमध्ये तसेच मतदार कर्मचार्यांमध्ये वादांगाचे प्रसंग होत असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु यंदा निवडणूक आयोगामार्फतच प्रत्येक मतदान कक्षाबाहेर मतदान लॉकरची सुविधा केल्यामुळे मतदानासाठी जाणार्या नागरिकांना आपला मोबाईल मोबाईल लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मोबाईल लॉकरमध्ये जवळजवळ सहा मोबाईल ठेवण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. आपला मोबाईल निवडणूक आयोगामार्फत निर्माण करण्यात आलेल्या मोबाईल लॉकरमध्ये ठेवल्यानंतर त्याला लॉक करून मतदारांना मतदान कक्षामध्ये जाता येत आहे. तसेच मतदान करून मतदान कक्षाबाहेर आल्यानंतर आपल्या लॉकर मधून मोबाईल घेऊन मतदान कक्षाबाहेर पडता येत आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवावा लागत होता. त्यामुळे मतदारांमध्ये तसेच पोलीस व मतदान कर्मचार्यांमध्ये वादंगाचे प्रसंग निर्माण होत होते. परंतु यावेळी निवडणूक आयोगामार्फतच मतदान कक्षाबाहेर मोबाईल लॉकरची सुविधा केल्यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.