Panvel Diwali 2024 : पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

पनवेल : पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा ५.० अंतर्गत आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल कामोठे येथे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे,शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी याबाबत महापालिकेच्यावतीने माहिती देण्यात आली. दिवाळीच्या दरम्यान फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते असते. तसेच ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. परिणामी श्वसनाचे त्रास होऊ लागतात. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या सूचनेनूसार ग्रीन फेस्टीवल अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी विद्यार्थ्यांनी साजरी करावी यादृष्टीने हा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच पर्यावरण विषयावर आधारित विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पुर्नवापर करण्यात येणाऱ्या वस्तूपासून पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविले.