•Panvel Murder News Update पनवेल शहर पोलिसांची यशस्वी कामगिरी ; कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेहाचे गूढ उकलले तसेच आरोपीलाही अटक करण्यात आली आहे
पनवेल :- पनवेल रेल्वे स्थानक परिसरात चर्चच्या जवळील बंद गोडावुन मध्ये कुजलेल्या स्थितीत असलेला मृतदेह 16 सप्टेंबर च्या दुपारच्या दरम्यान आढळला होता. मृतदेहाचा गळा आवळून हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या हत्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी आता या व्यक्तीच्या हत्येचा तपास लावण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता ते पडीक गोडावून असल्याने तेथे सीसीटिव्ही यंत्रणा नव्हते. मयत व्यक्ती हा तेथे नशापाणी करण्यासाठी कोणासोबत तरी गेला असावा असा कयास बांधुन संपुर्ण परिसर पिंजुन काढण्यात आला. अज्ञात आरोपी व अनोळखी मयत यांची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळी येणा-या सहा मार्गावरील फुटेजची पाहणी करण्यात आली. पोलीस पथकाने सात दिवसाच्या सीसीटिव्ही फुटेजच्या तपासणीदरम्यान पन्नास पेक्षा जास्त सीसीटिव्ही. कॅमे-यांचे फुटेज पाहिल्यानंतर
मयत व्यक्ती हा एका संशयीत ती सोबत त्या परिसरात वावरताना फुटेज मध्ये पोलिसांना आढळून आले. पोलीस पथकाने कौशल्याचा अचुक वापर करून संशयीत व्यक्तीचे नाव निष्पन्न केले होते .त्यानंतर धिरज राजु वर्मा, (27 वर्ष, रा. कोळीवाडा मच्छी मार्केट, पनवेल,रा. मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. गुन्हयातील आरोपीबाबत कोणत्याही प्रकारचा दुवा नसताना आधुनिक व पारंपारीक तपासाचा अवलंब करीत, कुठलाही मागमुस, धागेदोरे नसताना खुनाच्या गुन्हयातील अज्ञात मारेक-यास अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.आरोपी पुढिल कायदेशीर कारवाईकरिता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढिल तपास पनवेल शहर पोलीस ठाणे करीत आहे. तसेच, हा खुन कोणत्या कारणाने केला आहे? दोघांमध्ये वाद झाला होता का? का अजून कोण साथीदार आहे? अशी चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, नवी मुंबई मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमित काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे यांचे परिवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी गुन्हयाचा तपास सुरू केला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, प्रताप देसाई, मानसिंग पाटील, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे, महिला पोलीस हवालदार मंगल गायकवाड, पोलीस हवालदार जगदीश तांडेल पोलीस शिपाई नंदकुमार ढगे, अमोल मोहिते, महिला पोलीस शिपाई अदिती काकडे यांनी केलेली आहे.