मुंबई

Panvel Crime News : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! सोशल मीडिया टिंडर ॲप वरून महिलेची फसवणूक

पनवेल सायबर पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील आणि त्यांच्या पथकाने मोठी कारवाई, बनावट बँक खात्याच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

पनवेल :- न्हावाशेवा येथे राहणाऱ्या एमिली नावाच्या महिलेला सोशल टिंडर मीडिया ॲप वरून व्हाट्सअप ग्रुपला ॲड केले आणि www.flowertra.com ही लिंक पाठवून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. महिलेने ते खाते ओपन करून त्यामध्ये दहा लाख 40 हजार दोनशे बारा रुपयाची वेगवेगळ्या बनावट खात्या बँक अकाउंट मध्ये गुंतवणूक केली होती. परंतु आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 318 (4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 कलमच्या 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पनवेल सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील या करत असताना त्यांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हयाच्या तपासा दरम्यान फिर्यादी यांची फसवणुक केलेली रक्कम ज्या बैंक अकाउंट मध्ये घेण्यात आली, त्या बँक खात्यांची माहिती बँकांकडुन घेवुन त्याचे विश्लेषण केले असता, ‘वसई-विरार’ येथे बनावट बैंक अकाउंट बनविणारी एक टोळी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार ‘पनवेल सायबर सेल’ पथकाने वसई रेल्वे स्टेशनपासुन 100 मीटर अंतरावर असणाऱ्या बिल्डींगमधील एका शॉपवर कारवाई केली असता, तेथे एकुण 09 मुले मिळुन आली. त्यातील सुधीर जैन व संदेश जैन या मुलांच्या बॅगेमध्ये एकुण 52 वेगवेगळया बँकांचे डेबिट कार्ड, 18 मोबाईल, 17 चेकबुक, 15 सिमकार्ड, 08 आधारकार्ड, 07 पॅनकार्ड, 03 ड्रायव्हिंग लायसन्स, 02 वोटर आयडी कार्ड, बनावट व्यवसाय व्हीजीटींग कार्ड असे मिळुन आले. अधिक तपास करता योगेश जैन व हिमांशु सेन हे अनुक्रमे सुधीर जैन व संदेश जैन हे खोटे नाव धारण करून त्यांचे इतर साथीदारांशी संगनमत करून वसई विरार गोरेगांव इ. ठिकाणी शॉप भाडयाने घेवुन तेथे उत्तरप्रदेश, राजस्थान अशा इतरत्र राज्यातील मुलांना कामाकरीता बोलावुन त्या मुलांच्या नावे वेगवेगळया बँकांचे अकाउंट ओपन करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. भाडयाने घेतलेल्या शॉपवर वेगवेगळया मुलांच्या नावे वेगवेगळे बनावट भाडेकरार बनवुन व बनावट पोलीस व्हेरिफीकेशनची कागदपत्रे बनवुन वेगवेगळ्या बँकांमध्ये व्यवसायांचे करंट अकाउंट ओपन करतात. सदर बैंक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याचे सिमकार्ड व डेबिटकार्ड हे ट्रेनने उदयपुर, राजस्थान येथील त्यांचे साथीदारांना पाठवतात, सदर बँक अकाउंटचा वापर सायबर फ्रॉड करीता केला जातो.

अटक आरोपी

1.संदेश उर्फ हिमांशू दिनेश कुमार जैन (22 वय रा.ठि- पोस्ट संभुगड तहसील असीन जिल्हा भीलवाडा राजस्थान )

2.सुधीर जैन उर्फ योगेश पारसमल जैन (34 वय रा. ठी. सन टेक वेस्ट वर्ल्ड, नायगाव ईस्ट ठाणे पालघर)

पोलीस पथक
मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, नवी मुंबई, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नवी मुंबई, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2,अशोक राजपुत, सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग, यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सायबर फसवणुक गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ईएमसी, सायबर सेल, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार, महिला पोलीस हवालदार प्रगती म्हात्रे, पोलीस शिपाई अतुल मोहिते, विकी भोगम, समीर साळुंखे हे सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0