पनवेल:- पनवेल शहर परिसरात दोन चर्चमध्ये झालेले दोन चोरीचे गुन्हे पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणले आहेत व याप्रकरणी दोन नेपाळी सराईत चोरट्यांना अटक केली आहे.
शहरातील ओरियन मॉलच्या मागे असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर चर्च येथे झालेल्या चोरीमध्ये तेथील दानपेटी फोडून अंदाजे रु.50 हजार रुपये रोख चोरुन नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे शहरातील लाईन आळी येथील सेंट फ्रान्सिस न्यू चर्च येथेही चर्चच्या पाठीमागील दरवाजा तोडून तेथील कपाटात असलेल्या दान पेटीमधील रोख रक्कम 5 हजार रुपये चोरुन नेण्यात आले होते.
याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पो.हवा.नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो.ना.विनोद देशमुख आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे व तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत आरोपी अग्र धनबहाद्दुर बिष्ट उर्फ पवन (38 रा.तळोजा गाव) व धनबिरे राहुले विसुक्रमा (31 रा.तळोजा गाव) या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक तपासात हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत. यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…