मुंबईक्राईम न्यूज
Panvel Crime News : कर्नाळा बँक घोटाळ्यातील दोन आरोपींना सीआयडीने अटक केली

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळ्याशी संबंधित दोघांना सीआयडीने अटक केली आहे. तीन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विवेक पाटील गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात आहे. सीआयडीने माजी संचालक भालचंद्र तांबोळी आणि डॉ.आरिफ दवे यांना अटक केली आहे. कर्नाळा बँकेतील ५५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काही वर्षांपूर्वी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले. सीआयडीने यापूर्वी बँक अधिकारी हेमंत सुताणे आणि अपर्णा वडके यांना अटक केली होती.