Panvel Crime News : पनवेलमध्ये बिंगो जुगार जोमात; ऐन आचार संहिता काळात देखील पोलिसांच्या डोळ्यादेखत जुगार होता सुरूच
पनवेल जितिन शेट्टी :-
Panvel Crime News : पनवेल शहरातील खांदा कॉलनी येथील सेक्टर १० मध्ये एका इमारततीच्या दुकान गळ्यामध्ये बिंगो जुगार अड्डा जोमाने सुरूच आहे. Panvel Jugar Adda in Khanda Colony ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असतानाही खांदेश्वर पोलिसांच्या डोळ्यादेखत हा बेकायदेशीर जुगार सुरूच होता. सदर जुगार अड्डा बंद करण्याबाबत खांदेश्र्वर पोलिसात तक्रार अर्ज सादर करून देखील हा जुगाराचा धंदा आचार संहितेमध्ये सुरूच ठेवण्याचा पराक्रम खांदेश्र्वर पोलीसांच्यावतीने आणि त्यांच्या आशीर्वादाने मोकाटपणे सुरूच ठेवण्यात आला. Panvel Police Latest News
याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ – २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या देखील कानावर सदर बाब टाकण्यात आली असून सदर जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशाला झुगारून खांदेश्वर पोलीस Khandeshvar Police Station अशा जुगार धंद्यांना पाठबळ देताना दिसत आहेत. याठिकाणी खालील खान हे सदरचा धंदा चालवीत असून त्यांचे परिमंडळ – २ मध्ये इतरही ठिकाणी कामोठे, खांदा कॉलनी वैगेरे अशा प्रकारचे जुगार अड्डे सुरू आहेत. शहरामध्ये तरुणांना जुगाराकडे वळवून देशाचं भवितव्य असणाऱ्या युवा पिढीला बरबाद करण्याचे काम या जुगार अड्ड्यांमुळे होत असल्याने याठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे, तसेच सदर अवैध धंदे हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जामध्ये करण्यात आली आहे. Panvel Police Latest News
सदरचा दुकान गाळा बाहेरून बंद करण्यात येत असला तरी आत ऑनलाईन बिंगो जुगार हा धंदा सुरू असतो. भिंतीवर जवळपास ७ ते ८ मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यावर अनेक जण जुगार खेळत असतात. व्हिडिओ पार्लर चालविणाऱ्या खालील खान यांच्यामार्फत दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा व्यवहार केला जात आहे. त्यामुळे युवा पिढीला वाचविण्यासाठी नवीमुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील बिंगो जुगार कायमचे बंद करण्यात यावेत, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून पोलीस प्रशासन मात्र याबाबत कारवाई करण्यासाठी धजावत आहेत, असेच चित्र सध्या समोर आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ -१ आणि परिमंडळ – २ मधील तरुणाई बिघडविणारे अवैध धंदे बंद करण्यासाठी वेळी उपोषणाचे हत्यार उपसले जाण्याची तयारी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. Panvel Police Latest News