पनवेल | खांदेश्वर पोलीस ठाणे khandeshvar Police Station हद्दीत घडलेल्या एका कथित जबरी चोरीच्या गुन्ह्याचा थरार अखेर उघड झाला आहे. सोन्याच्या व्यापाऱ्याच्या विश्वासाला तडा देत, त्याचाच चालकाने बनाव रचल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासात समोर आले आहे. Panvel Latest Crime News
कसा घडला प्रकार?
सोन्याचे व्यापारी बी. बी. बांठिया ज्वेलर्स यांच्याकडून चालक शैलेश दिलीप कांबळे (३८, रा. घाटकोपर, मुंबई) याला १.५० लाख रुपये रोख आणि तब्बल ४.४० लाखांचे सोन्याचे दागिने (एकूण ५.९० लाख किंमतीचा मुद्देमाल) पनवेल मुख्य शाखेत नेण्यासाठी सोपविण्यात आले होते.
मात्र, खांदा कॉलनी रेल्वे ब्रिज येथे पोहोचल्यावर शैलेशने मालकाला सांगितले की – “दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून सर्व मुद्देमाल लुटून नेला.”
तपासात धक्कादायक उलगडा
गुन्हे शाखा कक्ष-३ पनवेलच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी आरोपीने सांगितल्याप्रमाणे कोणतेही संशयित फिरताना दिसले नाहीत. चौकशी दरम्यान शैलेश कांबळे याची गोची झाली आणि शेवटी त्याने “जबरी चोरीचा बनाव रचल्याची” कबुली दिली. Panvel Police Latest News
त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल – रोख रक्कम व सोन्याचे दागिने – पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वात,
सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, तसेच तपास पथकातील अनेक पोलिसांनी केली. Panvel Police Latest News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…