Panvel Court News : पनवेल येथील न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली (२८ सप्टेंबर २०२४ ) एकूण 3,153 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे
पनवेल :- जे.डी.वडणे, जिल्हा न्यायाधीश 1 तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पनवेल, रायगड यांनी दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली Delhi High Court यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच MSEB, Bank, Finance, Patpedhi Sanstha, अशा विविध विभागांकडून आलेली वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पनवेल येथील जिल्हा न्यायालयात आयोजित केल्या गेलेल्या लोक अदालतीमध्ये वादपुर्व व प्रलंबित अशी एकूण 23,988 प्रकरणे ठेवण्यात आली होती. 19,289वादपूर्व प्रकरणा पैकी 2,362 आणि 4,699 प्रलंबित खटल्यांपैकी 791 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. व त्याद्वारे पक्षकारांना आणि विविध विभागांना एकूण 14 कोटी 45 लाख 63 हजार 948 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. Panvel Court Latest Update
पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ आणि संपूर्ण कार्यकारणी मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले.
पनवेल येथील न्यायालयात लोकअदालतीचे 7 कक्ष स्थापन करण्यात आले होते. यासाठी कक्ष प्रमुख म्हणून एस. आर.चव्हाण साहेब - जिल्हा न्यायाधीश -4 व अति. सत्र न्यायाधीश, पनवेल, एन.पी.पवार, दिवाणी न्यायाधीश व.स्तर पनवेल, के. एम. सोनवणे, 3रे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल, एन.एस.काकडे, 4थे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर, पनवेल, एस.व्ही.साळवी, 3रे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर, पनवेल, पी. सी. बिडकर, 5वे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, पनवेल, डी. एम. वाघमारे, 7वे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर, पनवेल यांनी काम पाहिले तसेच पंच म्हणून ॲड. इंद्रजीत भोसले, ॲड. संतोषी चव्हाण, ॲड. सुयश कामेरकर, ॲड. मनीषा गावंडे, ॲड. वैशाली सुळेभावीकार, ॲड. समिना खान, ॲड. सुनिल येंदारकर यांनी काम पाहिले.
लोक अदालती मध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील प्रकरणे मिटवण्यात आली.
या लोकन्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग , न्यायालयीन कर्मचारी स्मिता आपटे , सहाय्यक अधीक्षक – जिल्हा न्यायालय, अविनाश चंदने, कनिष्ठ लिपिक आणि शैलेश कोंडसकर, विधी स्वयंसेवक, जिल्हा न्यायालय, पनवेल तसेच महानगरपालिका, बँक, पोलीस प्रशासन, इतर शासकीय विभाग आणि सर्व पक्षकार यांनी भरगोस असा प्रतिसाद दिला. याबद्दल जे.डी.वडणे, जिल्हा न्यायाधीश-1 तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती पनवेल रायगड यांनी सर्वांचे आभार मानण्यात आले. Panvel Court Latest Update