पनवेल : परभणी जिल्ह्यात पोलिसी अत्याचारात शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ सोमवारी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी. आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. याला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रिपब्लिकन सेना यांच्या वतीने पनवेलमध्ये बंद पुकारण्यात आला. यामध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सुभाष गायकवाड, पंचशिल शिरसाठ, सोहेब खत्रिका, आदनान अन्सारी आदींसह मोठ्या संख्येने भीम अनुयायी सामील होते व त्यांनी दुकानदार बांधवांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले, त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Related Articles
Maha Kumbha Mela Live : 25 लाख लोकांनी आज महाकुंभमेळ्यात स्नान केले, आतापर्यंत 7.30 कोटी लोकांनी महाकुंभमेळात स्नान केले
21 hours ago
Panvel News : धनश्री रेवडेकर यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या मुंबई शहर महिला उपाध्यक्षपदी निवड
1 day ago