पारगाव डुंगीत तणाव, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
पनवेल जितिन शेट्टी : पनवेलच्या पारगाव डुंगी येथे बांधलेला हजरत अली दर्गा सिडकोने (गुरुवार, २१ नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या दरम्यान जमीन दस्त केल्याचे वृत्त समोर आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फ्लाईंग झोनमध्ये ही बेकायदा कबर बांधण्यात आल्याचे सिडको आणि पोलिस अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून दर्गा हटवण्याकरिता सांगितले होते परंतु पोलिसांच्या नोटिसाला कोणत्याही प्रकारे उत्तरं मिळालेले पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पारगाव दुंगीचा हा भाग फ्लाईंग झोनमध्ये म्हणजेच नवी मुंबई विमानतळाच्या अतिसंवेदनशील भागात असल्याने तो पाडण्यात आला. या कारवाईनंतर पारगाव डुंगीमध्ये तणावाचे वातावरण आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव येथे मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान सुमारे 500 पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सामुदायिक तणाव आणि कोणतीही घटना घडू नये यासाठी येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य रस्त्याच्या वरच्या डोंगराळ भागात जाण्यास बंदी होती.