मुंबईक्राईम न्यूज
Trending
Panvel Breaking News : खांदा वसाहत परिसरात तृतीय पंथांच्या अश्लिल चाळ्याने नागरिक त्रस्त

पनवेल : खांदा वसाहत Khāndā vasāhata परिसरात गेल्या काही दिवसापासून प्रामुख्याने संध्याकाळी तृतीय पंथी Transgender यांच्या अश्लिल चाळ्यांमुळे येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. Panvel Breaking News


सदर तृतीयपंथी हे खांदा कॉलनी येथून पनवेलकडे आणि पनवेलकडून कळंबोलीकडे जाणार्या रस्त्यावर उभे राहून अश्लिल चाळे करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरात असलेल्या बगीच्यामध्ये सुद्धा त्यांचे अश्लिल चाळे सुरू असतात. याचा नाहक त्रास या भागातून ये-जा करणार्या नागरिकांना होत आहे. यांच्या अश्लिल चाळ्यांमुळे महिला वर्गाला मान खाली घालून जावे लागत आहेत. तरी संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशी करीत आहेत. Panvel Breaking News