Panvel BMC News : पावसाळ्यातील साथरोग- किटकजन्य आजार टाळण्याकरिता काळजी घ्या: महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पनवेल : पावसाळी कालावधीत (Rainy Season) विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी सांगितले आहे. वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यात घ्यावयाच्या खबरदारी विषयी जनजागृती विविध माध्यमांतून करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन (Panvel BMC Advised )नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे. Panvel BMC News
पावसाळ्यामध्ये अनेकवेळा दूषित पाण्यामुळे कॉलरा , गॅस्ट्रो, विषमज्वर असे जलजन्य रोग होण्याची भिती असते त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या,फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा. घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी ,डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी जेणे करून डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहरीचे पाणी शुध्दीकरण करूनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षार संजिवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी मनीप्लँट,वॉटरकूलर इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक वेळा पुर्णपणे काढून कोरडे करून कोरडा दिवस पाळावा , अशा सूचना वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. Panvel BMC News
तसेच जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले,ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही अशा हॉटेल इतर ठिकाणी ,खाणे, पाणी पिणे टाळावे, बाहेरील बर्फ खाणे टाळावे. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. Panvel BMC News