Panvel PMC : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत बँक प्रतिनिधींची मुख्यालयात बैठक
पनवेल : प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनाची अमंलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त श्री.मंगेश चितळे Commissioner Mr. Mangesh Chitale यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिका क्षेत्रातील विविध बॅंकांचे प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. Panvel PMC Latest News
यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय कुलकर्णी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, विविध बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते. Panvel PMC Latest News
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत रूपये दहा हजाराचे पथविक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कर्ज वेळेत किंवा वेळेच्या आधी फेडल्यास पथविक्रेत्यांना पुन्हा 20 हजार व त्यानंतर 50 हजार कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध बँका महापालिकेला प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबविण्यास उत्तम सहकार्य करत आहेत. पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत महानगरपालिकेने आत्तापर्यंत 12 हजार 250 पथविक्रेत्येंना कर्ज वितरीत केले आहेत. यापुढेही संबधित बँकानी प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज मंजूर झालेल्या अर्जदारांना लवकरात लवकर कर्ज वाटप करून सहकार्य करावे, तसेच याबाबतीत काही अडचणी येत असल्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी अशा सूचना आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी उपस्थितांना दिल्या. Panvel PMC Latest News
जी प्रकरणे बँकांनी मंजूर केली आहेत परंतू कर्ज वितरीत केले नाहीत अशा पथविक्रेत्यांना बँकानी तातडीने कर्ज वितरीत करण्याबरोबरच कर्जासाठी अर्ज केलेल्या पथविक्रेत्यांची प्रकरणे मंजूर करावीत अशा सूचना यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी उपस्थित बँक प्रतिनिधींना दिल्या.तसेच जी प्रकरणे पेडिंग आहेत त्यांची माहिती महापलिकेला देऊन सहकार्य करण्याविषयी सूचित केले. Panvel PMC Latest News
याबरोबरच दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या बचत गटांना बॅंकेत खाते उघडण्यासाठी, बॅंक लिंकिंग करून देण्यासाठी सर्व बॅंकांनी सहकार्य करावे अशा सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. तसेच बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देणे, बचत गटातील सदस्यांना व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज देण्यासाठी देखील बॅंकांनी सहकार्य करण्याबाबत बॅंक प्रतिनिधींना सूचित करण्यात आले. Panvel PMC Latest News