पनवेल (संजय कदम) : पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुर्नबांधणीचे काम सुरू असलेल्या कैलास पार्क सोसायटीचा 8 व्या मजल्याचा स्लॅब पडून 7 कामगार जखमी झाले असून, त्यामध्ये 2 कामगार गंभीर जखमी असल्याचे समजते. Panvel Latest Accident News
शहरातील कैलास पार्क सोसायटीचे पुर्नबांधणीचे काम सुरू असून या इमारतीचे आठव्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचे काम 10 कामगार करीत होते. सदर काम सुरू असताना अचानकपणे आज रात्रौ 8.45 च्या सुमारास तो स्लॅब खाली कोसळला. यावेळी बांधलेल्या संरक्षक जाळीमुळे तिसर्या मजल्यावर हा स्लॅब कोसळून त्यामध्ये 7 कामगारांना हात-पाय व डोक्याला जखमा झाल्या आहेत. त्यातील 2 कामगार हे गंभीर जखमी असून त्यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.
या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.अभंग व पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे पनवेल अग्नीशमन दलाचे जवान सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. सदर कामगारांची सुरक्षितता हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…