Pankaja Munde Latest News : संभाजीनगर विमानतळावर उड्डाणापूर्वीच बिघाड उघड; लातूरमधील प्रचारसभांच्या वेळापत्रकात बदल
छत्रपती संभाजीनगर | राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना घडली. हेलिकॉप्टरने हवेत झेप घेण्यापूर्वीच वैमानिकाला ही तांत्रिक अडचण जाणवली आणि त्याने वेळीच उड्डाण रद्द केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण होते, मात्र पंकजा मुंडे सुखरूप असून त्या दुसऱ्या विमानाने लातूरकडे रवाना झाल्या आहेत.
नेमकी घटना काय?
सध्या मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून पंकजा मुंडे झंझावाती प्रचार दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून त्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेणार होत्या. हेलिकॉप्टर सुरू झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांत तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. उशीर न करता सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…