महाराष्ट्र

Pankaja Munde : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही,’ पंकजा मुंडेंनी घेतली ठाम भूमिका

Pankaja Munde On OBC Reservation : हैदराबाद गॅझेटवर सरकार तोडगा काढेल, मुंडेंना विश्वास

मुंबई :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या यशस्वी आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर राज्याच्या पर्यटनमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ‘आर्थिक मागासलेपण हा वेगळा आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे’, असे सांगत ओबीसी समाजाच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या हिताची काळजी घेणार

सरकार मराठा समाजासाठी जीआर (GR) काढत असताना, ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी एक समिती स्थापन केली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, हा शब्द आमचा ओबीसींना आहे,’ असे ठामपणे सांगत मुंडे यांनी सरकार यावर नक्कीच सुवर्णमध्य काढेल असा विश्वास व्यक्त केला.

हैदराबाद गॅझेटचा फायदा मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चर्चा आहे. या गॅझेटनुसार, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या नात्यातील सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. यामुळे 58 लाख नोंदींच्या आधारे अनेकांना लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, या निर्णयामुळे ओबीसी समाजावर काही प्रमाणात अन्याय होण्याची शक्यता वाटत असेल, तर दोन महिन्यांत त्याची पडताळणी केली जाईल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

vivek

Recent Posts