क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Bhiwandi Accident News : भिवंडी-कल्याण रस्त्यावर खड्ड्यांमुळे तरुणाचा अपघाती मृत्यू; कंटेनरखाली चिरडून 19 वर्षीय राज सिंहचा अंत

Bhiwandi Latest Accident News : खड्डे आणि निष्काळजीपणामुळे जीवघेणा अपघात; भिवंडीत तणावाचे वातावरण

भिवंडी :- भिवंडी-कल्याण Bhiwandi Kalyan Road मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आज पुन्हा एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भिवंडीतील टेमघर येथे राहणाऱ्या राज सिंह (वय 19) या तरुणाचा दुचाकी खड्ड्यात आदळल्याने तोल जाऊन अपघात झाला आणि त्याचवेळी भरधाव कंटेनर त्याच्या शरीरावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. Bhiwandi Latest Accident News

चहा पिण्यासाठी निघाले आणि काळ बनून खड्डा समोर आला

राज सिंह आणि त्याचा मित्र अबीर विश्वास हे दोघे 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1.30 वाजता गप्पा मारत बसले होते. मध्यरात्री 2 वाजता त्यांनी भिवंडी-कल्याण मार्गाने कल्याणच्या दिशेने चहा पिण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. राज हा दुचाकी चालवत होता.

ते भिवंडी येथील साईबाबा मंदिर परिसराच्या पुढे आले असता, त्यांच्या मागून दोन कंटेनर वाहतूक करत होते. त्याचवेळी येथील एका मोठ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे पुढील चाक आदळले. दुचाकीचा तोल गेल्याने दोघेही रस्त्यावर खाली पडले.

दुर्दैवाने, त्याचवेळी मागून येणाऱ्या एका कंटेनरची त्यांना धडक बसली आणि त्यानंतर राज सिंह हा दुसऱ्या कंटेनरच्या चाकाखाली आला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा मित्र अबीर विश्वास जखमी झाला.

अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून लगेच पळून गेला. राज याच्या डोक्याला, हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी अबीरने एका रिक्षाचालकाच्या मदतीने आणि तिथे आलेल्या एका मित्राच्या मदतीने राजला भिवंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेमुळे भिवंडी-कल्याण रोडवरील खड्ड्यांच्या समस्येवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गुन्हा दाखल

या अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा Narpoli Police Station दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर मोटरवाहन अधिनियम, 1988 अंतर्गत कलम 134 (अ), 134 (ब), 184 आणि भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 चे कलम 106, 125, 281, आणि 324 (4) यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0