•गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे श्रद्धांजली; उद्या सकाळी काटेवाडीत तर 11 वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये अंत्यविधी
बारामती | “दादा, अशी एक्झिट घ्यायची नव्हती! तुम्ही जीवाला चटका लावून गेलात,” अशा अत्यंत भावूक शब्दांत राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली. बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात अजितदादांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर, पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आपल्या भावना व्यक्त करताना अजितदादांच्या ‘डायनामिक’ नेतृत्वाचा गौरव केला.
“अनुभवी आणि स्पष्टवक्ता नेता हरपला”
पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, “तुमच्यासोबत अनेक वेळा प्रवास केला, चर्चा केल्या आणि गप्पाही मारल्या. तुमचा पॉलिटिकल आणि अकॅडमिक सेन्स जबरदस्त होता. तुमच्या भाषणातून आणि विनोदबुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं, पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं आहे. असा अनुभवी नेता पुन्हा होणे नाही. महाराष्ट्र आज एका महान नेतृत्वाला मुकला आहे.”
अमित शाह अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेतेही बारामतीत दाखल होत आहेत. उद्या होणाऱ्या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन नबीन उपस्थित राहणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक मंत्री उद्या सकाळीच बारामतीत पोहोचण्याची शक्यता आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…