Beed Lok Sabha News : बीडच्या भाजपाचे उमेदवार पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांचा ऑडिओ क्लिप व्हायरल..
Beed Lok Sabha Election Latest News : मुंडे आणि राठोड यांच्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल.. उमेदवारी मागे घेण्याचे पंकजा मुंडे यांच्याकडून विनंती
बीड :- भारतीय जनता पक्षाचे नेत्या आणि बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि अपक्ष उमेदवार रविकांत राठोड (Ravikant Rathod) यांच्या तील संभाषणाचा ऑडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Pankaja Munde And Ravikant Rathod Call get viral On Social Media )
व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये पंकजा मुंडे सांगत आहे की, माझ्या विरोधातील उमेदवारी मागे घ्या तुम्ही केलेल्या सहकार्य मी भविष्यात लक्षात ठेवेल आणि त्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायला अशा प्रकारचे आश्वासन पंकजा मुंडे यांच्याकडून रविकांत राठोड यांना दिले आहे या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायला झाली आहे. पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना उमेदवारी मागे घेतल्या बाबत सांगत असून भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.बंजारा समाजाची मते हे मला मिळणार आहे. मात्र, रविकांत राठोड यांनी पाच-सहा हजार मते घेऊन त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे पंकजा मुंडे म्हणत आहेत. त्यामुळे राठोड यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असे पंकजा मुंडे त्यांना सांगत आहे. मात्र, ही ऑडिओ क्लिप खरी आहे की, खोटी या बाबत खुलासा झालेला नाही. Beed Lok Sabha Election Latest News