मुंबई

Pandurang Sakpal Passed Away : कट्टर शिवसैनिकांचे दुःखद निधन.. ठाकरेंना धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विभाग प्रमुख Pandurang Sakpal यांचे शनिवारी अल्पशाः आजाराने निधन

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी अल्पशाः आजाराने निधन झाले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ यांची दक्षिण मुंबईत ओळख होती. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

संजय राऊत यांनी व्यक्त केला शोक
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकपाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “पांडुरंग सकपाळ. धग धगता कडवट शिवसैनिक. दक्षिण मुंबई गिरगाव भागात त्याने विभाग प्रमुख म्हणून कार्याचा ठसा उमटवला. अनेक आंदोलनात पोलिसांचा मार खाल्ला. तुरुंग भोगला. पण पांडुरंग मागे हटला नाही. पांडू म्हणूनच तो लोकप्रिय होता. असा झुंजार पांडू आम्हाला सोडून गेला. विनम्र श्रद्धांजली”, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

2019 मध्ये पांडुरंग सकपाळ यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अजान स्पर्धा आयोजित केल्यामुळे पांडुरंग सकपाळ यांच्यावर बरीच टीका झाली होती. पांडुरंग सकपाळ यांनी 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांनी सांभाळली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0