Pandharpur Latest Suicide News : पत्नीने दोन मुलांसह विहिरीत उडी घेतली, पतीने गळफास लावून जीवन संपवलं
पंढरपूर | सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात रविवारी रात्री काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. कासेगाव येथील एका दाम्पत्याने आपल्या दोन चिमुरड्यांसह आयुष्य संपवले. पत्नीने शेतातील विहिरीत मुलांसह उडी मारली, तर पतीने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. Pandharpur Latest Suicide News
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत दाम्पत्याचे नाव म्हामाजी आणि सोनाली आसबे असून ते आपल्या सहा वर्षांच्या मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीसह राहत होते. रविवारी मध्यरात्री सोनालीने दोन्ही मुलांना घेऊन शेतातील विहिरीत उडी मारली. दुसरीकडे, म्हामाजीने घरात गळफास घेतला.
सकाळी ही घटना समोर येताच पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात पत्नी आणि मुलांचे मृतदेह न सापडल्याने शोधमोहीम राबवली असता विहिरीत तिघांचे मृतदेह सापडले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या आत्महत्येमागे घरगुती वाद असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी व्यक्त केला आहे. मात्र, यामागे इतर कोणतीही कारणं आहेत का, याचाही सखोल तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…