Panchavati Express : कसारा स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे दोन भाग, एक बोगी इंजिनसह गेली, प्रवाशांना धक्का
Panchavati Express get detached : शनिवारी सकाळी कसारा स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्याने इंजिन आणि एक बोगी मुंबईच्या दिशेने निघाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई :- कसारा स्थानकाजवळ Kasara Station आज सकाळी मोठा अपघात झाला. पंचवटी एक्स्प्रेसचे Panchavati Express कपलिंग तुटल्याने इंजिन आणि एक बोगी मुंबईच्या दिशेने निघाली. काही अंतर गेल्यावर इंजिन आणि डबे थांबले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जवळपास 35 मिनिटे ट्रेन थांबली. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
पंचवटी एक्सप्रेस Panchavati Express सकाळी 8.40 च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जात होती. यादरम्यान कसारा स्थानकाजवळ 3 आणि 4 क्रमांकाचा डबा वेगळा झाला. त्यानंतर सकाळी 9.02 च्या सुमारास पंचवटी एक्सप्रेसचे डबे पुन्हा जोडण्यात आले. यानंतर रेल्वेच्या सुरक्षेबाबत आश्वासन दिल्यानंतर सकाळी 9.15 च्या सुमारास पंचवटी एक्सप्रेस Panchavati Express मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.
यावेळी कसारा स्थानकाजवळ सुमारे 35 मिनिटे गाडी थांबली. या अपघातात कोणाचेही नुकसान किंवा दुखापत झाली नाही. माहिती देताना सीपीआरओ मध्य रेल्वे म्हणाले की, आता त्या मार्गावर गाड्या सुरळीत सुरू आहेत.