मुंबई

Palghar Tragedy Victims : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालघर मधील वर्सोवा खाडीनजीक बोगद्यात झालेल्या दुर्घटनेची पाहणी

•राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील ससूनघर गावातील दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

पालघर :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पालघर जिल्ह्यातील ससूनघर गावातील वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्यालावेग देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निर्देश दिले. Palghar Tragedy Victims

वर्सोवा खाडीनजीक सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर राकेश यादव त्यात जेसीबीसकट गाडाला गेला. त्याला बाहेर काढण्यासाठीच्या मदतकार्याला आता वेग दिला असून सैन्यदल, कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचावकार्य सूरु करण्यात आले आहे. यात या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. Palghar Tragedy Victims

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी राकेश यादव याच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्या सोबत असल्याचे सांगून त्यांना आश्वस्त केले. त्यांना 50 लाखांची मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्याला एलअँडटी कंपनीत नोकरीही देण्यात येणार आहे. त्याच्या मुलांना देखील आवश्यक ते सहकार्य कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असे यावेळी सांगितले. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आश्वासन देण्यात आले आहे. Palghar Tragedy Victims

शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार तसेच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय नौदल, सैन्यदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे अधिकारी आपल्या तुकडीसह उपस्थित होते. Palghar Tragedy Victims

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0