क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Palghar Police Bribe News : लाचखोर पोलिस शिपाई पन्नास हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, एका खाजगी इसमालाही अटक

Palghar Latest Police Bribe News : एम.डी. अंमली पदार्थ विक्री करायची असेल तर दरमहा 50 हजार रुपयांचा हफ्त्यांची लाच मागणाऱ्या लाचखोर पोलीस शिपाईसह एकाला ठाणे लाच लुचपत विभागाद्वारे रंगेहात अटक करण्यात आली आहे.

पालघर :- पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्यात Tulij Police Station Officer Taking Bribe कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई सह एका खासगी इसमाना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. Palghar Latest Bribe News पांडुरंग विठ्ठल सगळे 34 वर्षीय लाचखोर पोलीस शिपाई आणि आदर्श सुनील गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे.

तक्रारदार यांना पोलीस शिपाई पांडूरंग विठल सगळे एम.डी. विक्री करण्याकरीता दरमहा पन्नास हजार रुपये हप्ता म्हणून लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना पोलीस शिपाई सगळे यांना लाच दयावयाची इच्छा नसल्याने त्यांनी 25 फेब्रुवारी 2025 रोजी लोकसेवक सांगळे हे 50 हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्या बाबत ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे कार्यालयात लेखी तक्रार नोंदवली.

एसीबीने त्याप्रमाणे दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई मध्ये पोलीस शिपाई पांडुरंग सगळे यांनी तक्रारदार यांचेकडे पन्नास हजार रुपयांची लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम खाजगी इसम पानटपरी चालक यांचेकडे देण्यास सांगितले. एसीबीने 28 फेब्रुवारी रोजी पोलीस शिपाई पांडूरंग विठठ्ठल सगळे यांनी खाजगी इसम आदर्श सुनिल गुप्ता यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच खाजगी व्यक्तीला यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तसेच लोकसेवक पोलीस शिपाई पांडूरंग विठठ्ल सगळे तुळींज पोलीस ठाणे येथुन ताब्यात घेण्यात आले आहे., त्याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एसीबी पथक
शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे, संजय गोविलकर, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे,सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे विजय कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0