मुंबई
Palghar News : पालघर किनारपट्टी परिसरात संशयास्पद बोट, सतर्कतेनंतर पोलीस तपासात!
•पालघर किनारपट्टी परिसरात एक संशयास्पद बोट दिसली आहे. मच्छिमार मासेमारीसाठी वापरत असलेल्या बोटीपेक्षा ही बोट वेगळी असल्याचा स्थानिक लोकांचा दावा आहे.
पालघर :- एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघरच्या घोलवड येथील समुद्रात गुरुवारी (3 ऑक्टोबर) रात्री एक संशयास्पद बोट दिसली. घोलवड परिसरात एक बोट दिसल्याची माहिती काही तरुणांनी पोलिसांना दिली, मात्र काही वेळाने बोट मागे फिरली.
मच्छिमार मासेमारीसाठी वापरत असलेल्या बोटीपेक्षा ही बोट वेगळी असल्याचा स्थानिक लोकांचा दावा आहे. ही माहिती मिळताच पालघर पोलीस आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच पोलीस पथकाने या संशयास्पद बोटीची चौकशी सुरू केली आहे.