
Palghar Latest Bribe News : डहाणू तालुक्यातील आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
पालघर :- लाचलुचपत प्रतिबंध विभाग पालघर Palghar Anti Corruption Bureau यांनी कारवाई करत दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या 2 Lakh Bribe डहाणू तालुक्यातील आशागड येथील कनिष्ठ अभियंता अतुल अशोक आव्हाड यांना अटक केली आहे.Palghar Latest Bribe News वीज चोरीच्या प्रकरणात कारवाई होऊ नये यासाठी तीन लाखांची लाज आव्हाड यांनी मागितली होती त्यापैकी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना आज त्याला सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. याआधीही महावितरणच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारामध्ये पकडण्यात आले होते. त्यामुळे पालघरचा महावितरण विभाग लाचेच्या प्रकरणांमध्ये गुरफटल्याचे या कारवायांवरून दिसून येत आहे. याआधी पालघरच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या दोघांवर लाचलुचपत विभागाने लाचेच्या प्रकरणात कारवाई केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार याच्या तबेल्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी तक्रारदार यांना सात लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई न करण्यासाठी कनिष्ठ अभियंता आव्हाड याने तीन लाख रुपये लाच तक्रारदाराकडून मागितली होती. तक्रारदार यांनी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीत पडताळणी केली. मागणी केलेल्या लाचेच्या तीन लाख रुपये रकमेपैकी दोन लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना कनिष्ठ अभियंता आव्हाड याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पालघरच्या पथकाचे पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस कर्मचारी नवनाथ भगत, योगेश धारणे, विलास भोळे, दीपक सुमडा, आकाश लोहरे, जितेंद्र गवळी यांनी केली आहे.