मुंबई
Palghar Fire News : पालघरमधील फार्मा कंपनीला भीषण आग

Palghar Latest Fire News : पालघरच्या वाड्यातील खुपरी एमआयडीसी परिसरात ही फार्मा कंपनी आहे. या कंपनीला आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पालघर :- पालघरमध्ये एका औषध कंपनीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. Palghar Latest Fire News मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील वाडा येथील खुपरी एमआयडीसी परिसरातील अमेरिकन फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली. शनिवारी (01 मार्च) दुपारी 3.30 च्या सुमारास या कंपनीत आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
वाडा नगरपंचायत अग्निशमन दलाचे एक वाहन घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. या आगीत कंपनीचा एकही कर्मचारी अडकला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.