क्राईम न्यूजमुंबई
Trending

पालघर : पंचायत समिती वाड्याच्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकास लाच घेताना रंगेहात पकडले

Palghar Latest Bribe News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विहीर मंजुरीसाठी 15 हजारांची मागणी

पालघर :- पंचायत समिती वाडा, जिल्हा पालघर येथे कार्यरत असलेले कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सुशिल भिमराव कटारे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना 5 thousand Bribe लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे Anti Corruption Bureau Thane यांनी रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदाराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीरीसाठी 5 लाख रुपयांच्या निधीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर कटारे यांनी निधी मंजूर करून देण्यासाठी स्वतःसाठी पाच हजार रुपये व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी दहा हजार रुपये, अशा एकूण पंधरा हजार रुपयांची लाच मागणी केली होती.

या लाच मागणीविरोधात तक्रारदाराने 15 मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली.त्यानंतर झालेल्या पडताळणीत कटारे यांनी रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यानुसार,सापळा रचून त्या दिवशीच कारवाई करण्यात आली त्यावेळी तक्रारदाराकडून 5,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना सुशिल कटारे यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक (एसीबी पथक) संतोष अबिके यांनी कारवाई करत सध्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0