Palghar Bribe News : याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल दिली होती.
पालघर :- शहापूर मधील नायब तहसीलदार दत्तात्रय बांबळे यांना 25 हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (6 मे) रंगेहात पकडले. विरार येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले जिवदानी देवी संस्थान यांच्या मालकीची शहापूर येथील मौजे वाशाळा व वेळूक येथे जागा आहे. त्या जागेचा 7/12 वरील उताऱ्यामधील विश्वस्ताच्या नावात बदल करून सुधारित 7/12 उतारा तयार करून द्यावे याकरिता नायब तहसीलदाराने मंदिर व्यवस्थापकाकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. Palghar Bribe News
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तहसील कार्यालय येथे दत्तात्रय बांबळे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार हे जिवदानी देवी संस्थान, विरार या मंदिराचे व्यवस्थापक आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जिवदानी देवी संस्थान या मंदिराचे शहापूर तालुक्यातील मौजे वाशाळा व वेळूक येथे मालकीची जागा आहे. त्या जागेवर जमिनीच्या 7/12 उताऱ्यामध्ये विश्वास्तांच्या नावात बदल करून सुधारित 7/12 उतारा तयार करण्याकरिता तक्रारदार यांनी तहसीलदार शहापूर कार्यालयात नोव्हेंबर 2024 अर्ज दाखल केला होता. उतारा मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी पत्रान्वये मदतनीस नेमला होता फेब्रुवारी 2025 रोजी मदतनीस यांनी तक्रारदार यांना फोनद्वारे कळविले की, आपले 7/12 वर नाव बदलण्याचे काम नायब तहसीलदार यांचेकडे सध्या प्रलंबित अमून सदर कामाकरीता नायब तहसिलदार यांनी 25 हजार मागणी केली आहे. तक्रारदार यांना लाचेची मागणी केलेली रक्कम 25 हजार त्यांना देण्याची इच्छा नसल्याने दिनांक 12 मार्च 2025 ला.प्र.वि. पालघर यांचेकडे तक्रार केली.
तक्रारदार यांचे मदतनीस यांच्यामार्फतीने 7/12 उताऱ्याचे कामाकरता 25 हजार लाचेच्या रक्कमेची मागणी केल्याचे मान्य केले तसेच तक्रारदार यांचे समक्ष पुन्हा संभाषणादरम्यान दुजोरा देवुन रू. 25 हजार लाचेच्या रक्कमेची मागणी केली असल्याचे व काम झाले नंतर संपर्क करणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर लोकसेवक याने तक्रारदार यांच्याशी लाचेच्या रक्कमेकरीता संपर्क साधला नसल्याने मंगळवारी (6 मे) दत्तात्रय बांबळे, नायब तहसिलदार, शहापुर यांचे विरूध्द शहापुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार नायब तहसीलदाराचा पोलिसांकडून आणि एसीपी पथकाकडून शोध घेतला जात आहे अशी माहिती हर्षल चव्हाण, उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी दिली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…