•100 KVA हॉलटेज बदलून देण्यासाठी तीस हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कंत्राटी वायरमेन गुरुवारी (27 मार्च) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
पालघर :- 100 KVA हॉलटेज बदलून देण्यासाठी तीस हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कंत्राटी वायरमेन गुरुवारी (27 मार्च ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. त्याच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश चंद्रकांत मोरे (कंत्राटी कामगार) असे गुन्हा दाखल झालेल्या वायरमेनचे नाव आहे.याप्रकरणी एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मोरे याच्या विरोधात पालघर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांनी महावितरण यांच्याकडे नव्याने 100 KVA व्हॉलटेज क्षमतेने ट्रान्सफार्मर बसवण्यात यावे अशी मागणी केली होती.
तक्रारदार यांचे विकास नगर, खारीकुरण, तालुका पालघर येथे कोलंबी प्रकल्प सुरू असून त्या प्रकल्पाकरिता जी वीज जोडणी केली आहे त्यातून कमी हॉलटेज प्राप्त होत असल्याची अशी तक्रार महावितरण कार्यालयात दिली होती. तसेच,नव्याने 100 KVA व्हॉलटेज क्षमतेने ट्रान्सफार्मर बसवला होता. नव्याने बसवण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरमुळे तक्रारदार यांच्या प्रकल्पाला चांगला फायदा होणार असल्याची माहित असल्याने वायरमेन यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तसेच जर लाचेची रक्कम दिली नाही तर पुन्हा कमी क्षमतेची वीजपुरवठा होईल अशी व्यवस्था ही करण्याची धमकी दिली होती. या संदर्भात तक्रारदार यांनी 26 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी करून वायरमेन राजेश चंद्रकांत मोरे यांनी नव्याने 100 KVA व्हॉलटेज क्षमतेने ट्रान्सफार्मर बसवण्याची आल्यामुळे तक्रारदार यांचा फायदा होणार असल्याने त्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने सापळा रचून तक्रारदार याला लाचेची रक्कम स्वीकारताना आज (27 मार्च) रोजी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात आहे.
शिवराज पाटील पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सुहास शिंदे अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,संजय गोविलकर अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षल चव्हाण पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर यांनी यशस्वी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…