क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Palghar Bribe News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वाड्यात कारवाई, ‘उमेद’ अभियानातील अधिकारी ‘एसीबी’ च्या जाळ्यात

Palghar Latest ACB News : मानधनाच्या चेकसाठी लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास रंगेहात पकडले

पालघर :- उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या एका महिला लोकसेविकेला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक Palghar ACB Trap News विभागाने (एसीबी) 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई वाडा येथील तालुका अभियान व्यवस्थापन कार्यालयात करण्यात आली असून, आरोपी महिला अधिकाऱ्याने मानधन काढून दिल्याबद्दल ही लाच स्वीकारली. Palghar Latest Bribe News

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, एका 32 वर्षीय महिला तक्रारदार या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘उमेद’ योजनेत समुदाय व्यक्ती म्हणून मानधनावर काम करतात. त्यांना केलेल्या कामाचे 19,800 रुपयांचे मानधन मिळाले होते. मात्र, मानधनाचा चेक दिल्यानंतर त्यातील 10,000 रुपये लाच म्हणून देण्याची मागणी उमेद कार्यालयातील प्रभाग समन्वय अधिकारी रेणुका रणवीर आत्राम (वय 30) यांनी केली होती.

तक्रारदार महिलेने लाच देण्यास नकार देत 4 ऑगस्ट 2025 रोजी एसीबीच्या पालघर युनिटकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्ट 2025 रोजी पडताळणी करण्यात आली, ज्यात आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस उप-अधीक्षक दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक राकेश डांगे यांच्यासह पोलीस हवालदार विलास भोये, योगेश धारणे, नवनाथ भगत, प्रकाश दळवी आणि पोलीस अंमलदार गीता कहार, आकाश लोहारे, जितेंद्र गवळे यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0