मुंबई

Palghar Bribe Case : उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक एसीबीची धडक कारवाई ; जमीन प्रकरणात 50 हजारांची लाच

Secret Land Deal Exposed: District Official Caught in Mysterious Bribery Scandal लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांची कारवाई ; सामान्य प्रशासन विभाग उपजिल्हाधिकारी सजीव जाधवर यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना मुंबई एसीबीने रंगेहत पकडले

पालघर :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी धडक कारवाई करत पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. Trending Scandal : District Official Caught Red-Handed in Bribery Scheme with Mumbai Department जमिनीचे प्रकरण मंजूर करून मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार याचे वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी एक प्रकरण उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभाग संजीव जाधवर यांच्याकडे गेले होते. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, मात्र तरी देखील हे प्रकरण मंजूर करुन मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. Trending Scandal : District Official Caught Red-Handed in Bribery Scheme with Mumbai Department त्यानंतर तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सापळा रचला.मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0