•परराष्ट्र मंत्रालयाचे कडक प्रत्युत्तर; “स्वतःच्या अडचणींसाठी इतरांना दोष देऊन पाकिस्तान स्वतःचीच फसवणूक करत आहे”
ANI | पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका शिया मशिदीत शुक्रवारी नमाजाच्या वेळी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. या भीषण हल्ल्यानंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारतावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने हे दावे अत्यंत निराधार आणि निरर्थक असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
नेमकी घटना काय?
शुक्रवारी दुपारी इस्लामाबादच्या शहजाद टाउनमधील ‘तरलाई इमामबारगाह’ येथे नागरिक नमाजासाठी जमले असताना हा स्फोट झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोराने मशिदीच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांनी त्याला रोखले. तिथेच त्याने स्वतःला उडवून दिले. जर तो आत शिरला असता, तर मृतांचा आकडा अधिक मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भारताची आक्रमक भूमिका
पाकिस्तानने या हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा जावईशोध लावल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कडक भूमिका घेतली आहे. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”इस्लामाबादमधील स्फोट निषेधार्ह आहे आणि आम्ही जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो. मात्र, आपल्या देशांतर्गत समस्या सोडवण्याऐवजी पाकिस्तान इतरांवर दोषारोप करून स्वतःची फसवणूक करत आहे. भारतावरील हे आरोप जितके निराधार आहेत, तितकेच ते निरर्थक आहेत.”
पाकिस्तानमधील वाढता हिंसाचार
कडक सुरक्षा असलेल्या इस्लामाबादमध्ये असे स्फोट होणे दुर्मिळ मानले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः शिया अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य केले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी बलुचिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारासाठीही पाकिस्तानने भारतावर आरोप केले होते, जे भारताने यापूर्वीच फेटाळले आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…