Pahalgam Tourist Attack News राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यावर शहीद आदिल हुसेन शहा यांचे पक्के घर बांधून देण्याची खास जबाबदारी.! राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडून पेहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल हुसेन शहा कुटुंबियांना बाजीराव चव्हाण यांच्या हस्ते रोख 5 लाखाची आर्थिक मदत सपूर्द.
पहेलगाम : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार पेहलगाम हल्ल्यात शहीद झालेले आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि युवासेनेचे निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी अनंतनाग जिल्ह्यातील हापतनाड गावात शहीद आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी भेट घेतली. तेव्हा शिवसेनेकडून या कुटुंबीयांना तात्काळ ५ लाख रुपयांची रोख रक्कम तात्काळ आर्थिक मदत म्हणून देण्यात आली. त्याचबरोबर आदिल हुसेन यांचं जीर्ण अवस्थेतील घर बांधून देण्याची जबाबदारी ही “राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली आहे. तसेच शहीद आदिल हुसेन शहा यांच्या घराचे बांधकाम करण्याची जबाबदारी युवासेनेचे तडफदार वेक्तिमहत्व असलेले युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील हापतनाड गावात शहीद आदिल हुसेन शहा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शिवसेना, यूवासेनेचे बाजीराव चव्हाण व काही पदाधिकारी तेथे पोहचले असता. तेव्हा त्यांनी शिवसेनेकडून या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत सपूर्द केली.
त्यावेळी हापतनाड येथे पत्रकारांनी या भेटी बद्दल युवासेनेचे बाजीराव चव्हाण यांना या भेटीबद्दल काही प्रश्न विचारले असता. त्यावेळी पत्रकार यांच्याशी बोलतांना बाजीराव चव्हाण यांनी सांगितले की, “पेहलगाम येथील निष्पाप पर्यटकावरील हल्ला हा एक भ्याड हल्ला असून आम्ही याचा निषेध करतो. आणि निष्पाप पर्यटकांनी आपले प्राण गमावले ते शहीद झाले त्यांना आदरांजिल वाहतो. याचा भारतीय सेना लवकरच नक्कीच बदला घेऊन सडेतोड उत्तर देईलच. पन अनंतनाग जिल्ह्यातील हापतनाड गावातील शहीद आदिल हुसेन शहा यांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता. पर्यटकांची कुठलीही जात- पात न पाहता. त्यांना त्यावेळी दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. व अनेक पर्यटकांचे त्यांनी प्राण वाचून ते स्वतः त्याठिकाणी शहीद झाले. आश्या भारत वासियांचा आम्हाला अभिमान वाटतो. आज शहीद आदिल हुसेन शहा आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या पाठीमागे त्यांच्या परिवारात भाऊ- बहीण आई, वडील असा परिवार आहे.
ते परिवाराचे करते धरते एक जिम्मेदार वेक्ती होते. आज त्यांच्या जाण्याने त्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या परिवाराचा उदरनिर्वाह करणाराच या जगात आज नसल्याने त्यामुळे आज आम्ही शहीद आदिल हुसेन शहा यांच्या परिवाराला भेट देण्यासाठी आलोत. आणि त्यांच्या परिवाराला तात्काळ भेट देऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत आम्ही त्यांना तात्काळ मदत म्हणून रोख 5 लाखाची मदत केली आहे. सोबतच त्यांना एक पक्के घर बांधून देणार असल्याचेही यावेळी युवा सेना निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे या भेटीतून महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचा एका सच्चा भारतवासी आणि सामान्य व्यक्तीच्या मदतीसाठी धावून येण्याचा प्रसंग या भेटीतून दिसून आला. शिवसेना नक्कीच गोरगरीब सर्वसामान्य यांच्या हिताच्या बाजूने भक्कमपणे उभा राहण्याचं काम महाराष्ट्रासह देशभरात करत असल्याचे या भेटीतून दिसून आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…