क्राईम न्यूज

Operation Sindoor: नौदलाच्या क्लार्ककडून पाकला संरक्षण गोपनीयता; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात आयएसआयला माहिती लिक

Operation Sindoor: क्रिप्टोच्या मोबदल्यात देशद्रोह! सोशल मीडियावर पाक हनीट्रॅपला माहिती पुरवली

ANI :- भारतीय नौदल मुख्यालयात कार्यरत असलेल्या क्लार्कने ‘ऑपरेशन सिंदूर’ Operation Sindoor दरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयला अत्यंत संवेदनशील संरक्षण माहिती पुरवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राजस्थान सीआयडी इंटेलिजन्स युनिटने कारवाई करत विशाल यादव (वय 31, हरियाणा) या संशयिताला अटक केली आहे.

गुन्ह्याची पद्धत अत्यंत धक्कादायक असून, ‘प्रिया शर्मा’ नावाने सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या पाकिस्तानी महिला एजंटकडे विशाल माहिती पाठवत होता. या माहितीच्या बदल्यात त्याला क्रिप्टोकरन्सी व बँक ट्रान्सफरद्वारे मोठी रक्कम मिळत होती, अशी माहिती वरिष्ठ अधिकारी विष्णुकांत गुप्ता यांनी दिली.

विशेष म्हणजे, या क्लार्कचे ऑनलाइन गेमिंग आणि सट्ट्याचे व्यसन होते. त्यात मोठे नुकसान झाल्यानंतर आर्थिक अडचणीतून त्याने हा देशद्रोहाचा मार्ग स्वीकारल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात सध्या अनेक सुरक्षा आणि गुप्तचर संस्था त्याची कसून चौकशी करत आहेत.

मोबाईल तपासणीदरम्यान संवेदनशील कागदपत्रे, मेसेजेस आणि बँक व्यवहारांचे पुरावे मिळाले, ज्यामुळे पाकिस्तानशी असलेला थेट संबंध सिद्ध झाला आहे.
सीआयडी इंटेलिजन्सने अनेक महिन्यांच्या देखरेखीनंतर हा सापळा रचत आरोपीला अटक केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

51 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago