क्राईम न्यूजमुंबई
Trending

“ऑपरेशन प्रहार”ची धडक कारवाई : नवी मुंबईत 20 किलो गांजासह 7 जण अटकेत

Navi Mumbai Police Latest News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पहाटे कारवाई; 40 लाखांचा गांजा आणि रोख रक्कम जप्त; 7 गुन्हे दाखल

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून, एकाच वेळी केलेल्या धाडीत तब्बल 20 किलो 700 ग्रॅम गांजा, अंदाजे 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Navi Mumbai Police Latest News

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजता ही समांतर कारवाई करण्यात आली. “ऑपरेशन प्रहार” मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली एकूण 150 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

तळोजा, कळंबोली, खारघर, रबाळे एमआयडीसी आणि वाशी या भागांमध्ये 48 संशयित अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 जणांकडून गांजासह रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या कारवाईपूर्वी एप्रिल 2025 मध्ये देखील गुन्हे शाखेने 2 कोटी 72 लाख रुपये किंमतीचा आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा जप्त करत मोठा गुन्‍हा उघडकीस आणला होता. या प्रकरणात डार्क वेबच्या माध्यमातून परदेशातून गांजा मागवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता.

नशा मुक्त नवी मुंबई” अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीसांची ही कारवाई असून, नागरिकांसाठी 8828-112-112 हा हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्त भारंबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेतून नवी मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0