Mumbai Police Latest News : रायगडमधून बळीताची थरारमय सुटका, सात सराईत गुन्हेगार अटकेत
मुंबई | एखादा थरारपट लाजेल अशी कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी फक्त 5 दिवसांत करून दाखवली! बळजबरी, अमानुष मारहाण आणि खंडणीसाठी अपहरण केल्याच्या गुन्ह्यातील सात आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करत रायगडमधून बळीत व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. Mumbai Police Latest News
12 जून 2025 रोजी दुपारी जोगेश्वरी पश्चिम येथील हॉटेल अलीबाबाजवळून दोन बिझनेस संबंधित व्यक्तींचं तीन वेगवेगळ्या मोटारगाड्यांमधून अपहरण करण्यात आलं. त्यांना रायगड जिल्ह्यातील एका फार्महाउसवर नेऊन तिथं बेदम मारहाण करत खंडणी मागण्यात आली होती.या प्रकरणी 10 जुलै रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात Oshiwara Police Stationगुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या गांभीर्यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.
पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन (DCP Detection) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या 6 विशेष पथकांनी तांत्रिक तपास, लोकेशन ट्रॅकिंग, आणि आंतरराज्य पाळत ठेवून कारवाई केली. आरोपी रायगड, नाशिक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश ते थेट दिल्लीपर्यंत फरार झाले होते.
शेवटी 15 जुलै 2025 रोजी रात्री, गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशातील बांदा येथून 3 आरोपींना अटक केली तर उर्वरित 4 आरोपींना मुंबई व रायगड जिल्ह्यातून पकडण्यात आलं. पोलिसांनी अपहरणासाठी वापरण्यात आलेली वाहने, मोबाईल फोन्स, डोंगल आदी मुद्देमालही हस्तगत केला आहे.7 आरोपींना संगठित गुन्हेगारी कायदा (MCOCA), अंमली पदार्थ, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, व अपहरणाचे जुने अपराधी आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, मुंबई, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई, लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त (प्रकटीकरण), राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) सुनिल चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील विविध पथकाने केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…