Operation Akhal: रात्रभर चाललेल्या ‘ऑपरेशन अखल’मध्ये एका अज्ञात अतिरेक्याला कंठस्नान; परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता
ANI :- दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका मोठ्या मोहिमेत एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. कुलगाममधील अखल गावात अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. भारतीय सैन्यदलाने या मोहिमेला ‘ऑपरेशन अखल’ असे नाव दिले असून, रात्रभर गोळीबार सुरू असलेल्या या चकमकीत हे यश मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि निमलष्कर दलाच्या संयुक्त पथकाने ही घेराबंदी करत शोध मोहीम सुरू केली होती. ‘चिनार कॉर्प्स’च्या अधिकृत एक्स हँडलवरून या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात चार ते पाच दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली असून, उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
मागील महिन्यातील तिसरी मोठी कारवाई
गेल्या काही दिवसांपासून भारतीय सुरक्षा दल काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. महिन्याभरातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.
ऑपरेशन शिवशक्ती: जुलैच्या अखेरीस पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.
ऑपरेशन महादेव: त्यानंतर, 28 जुलै रोजी श्रीनगरच्या लिडवास भागात झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले होते. हे दहशतवादी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात सामील असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत दिली होती.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…