Online Share Market Fraud : ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळून देण्यात सायबर पोलिसांना यश
Nalasopara Online Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेले पैसे चोरट्याने डल्ला, सायबर विभागाची कामगिरी पैसे परत मिळवून देण्यास यश
नालासोपारा :- मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या Kashmira Police Station परिसरात राहणाऱ्या स्टेला फर्नाडीस यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळण्याची आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी शेअर मार्केट ॲप मध्ये ऑनलाईन 17 लाख 27 हजार रुपयाची ऑनलाईन गुंतवणूक केली होती. Share Market Online Investment परंतु आपली आर्थिक फसवणूक झालेली लक्षात येताच त्यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवी कलम 420,34 तंत्रज्ञान (सुधारणा), अधिनियमन 2008 कलम 66 (डी),66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Nalasopara Latest Cyber Crime News
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने महिलेच्या तक्रारीवरून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महिलेच्या खात्यासंदर्भात पडताळणी केली.पोलिसांनी महिलेने पाठविलेल्या बँक खात्यावरील रक्कम गोठाविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर पोलिसांनी बँक, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फसवणुकीतील 17 लाख 27 हजार रुपयांच्या रक्कमेपैकी 13 लाख सायबर विभागाने महिलेच्या खात्यात पुन्हा आणून दिले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे ऑनलाइन फसवणुकीत बळी पडलेल्या महिलेची रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Nalasopara Latest Cyber Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे. Nalasopara Latest Cyber Crime News