Online Scam : ऑनलाइन फसवणूक ; क्रेडीट इन्स्टॉलमेंट लोन ज्या नावाने फसवणूक
काशिमीरा पोलीस ठाण्यास यश ; ऑनलाईन लोन ॲप च्या माध्यमातून वॉलेटमध्ये जमा झालेले लोनचे पैसे काढण्यासाठी तक्रारदार यांचेकडून अनोळखी आरोपींनी 3 लाख 29 हजार 750 इतकी रक्कम घेवून फसवणुक झालेली असताना संपूर्ण रक्कम हि तक्रारदारांना परत करण्यात यश
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणाया दर्शन जगदीश व्यास, (रा.ठि. शांती गार्डन, मिरारोड पुर्व, ठाणे ) यांना पैशाची गरज असल्याने गुगलवरुन क्रेडीट इन्स्टॉलमेंट लोन ॲप व वॉलेट हे थर्ड पार्टी ॲप्लीकेशन डाउनलोड केले व त्यानंतर ऑनलाईनरित्या अनोळखी इसमाच्या सांगण्यावरुन वॉलेटमधील पैसे काढण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगुन एकुण 3 लाख 29 हजार 750 रुपये इतकी रक्कम अप्रमाणिकपणे वेगवेगळ्या बैंक खात्यात ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करुन फिर्यादीस कोणत्याही प्रकारचे लोन न देता व पाठवलेले पैसे ही परत न करता फसवणुक केली म्हणून काशिमीरा पोलीस स्टेशन येथे भादंवीसं कलम 420,34 सह माहिती तंञज्ञान अधिनियम कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. नमूद तक्रारी बाचत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. Online Scam
प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात चळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्या करीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या संपूर्ण रक्कम 3 लाख 29 हजार 750 रुपये रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Online Scam
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले, पोलीस हवालदार दिनेश आहेर पोलीस शिपाई प्रदिप काटकर यांनी पार पाडली आहे. Online Scam