Online Money Scam : ऑनलाईन आर्थिक फसवणूक
सायबर पोलीस ठाणेस यश ;ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रुपये 50 हजार परत
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमिरा परिसरातील बहार यांनी ऑनलाईन बुक मागविले होते. त्यासंदर्भात कुरीयर सर्विस मधून बोलत असल्याचे भासवून त्यांची वैयक्तीक माहिती घेवून अनोळखी लिंक पाठवून त्याद्वारे 50 हजार रुपयाची फसवणूक झाले बाबत तक्रार सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्राप्त होती. तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. सर्व व्यवहार एअरटेल पेमेंट बैंकेच्या खात्यावर गेल्याचे दिसून आले. तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या रकमेबाबत Airtel Payments Bank यांचेसोबत तात्काळ पत्रव्यवहार करून फसवणूक झालेली रक्कम थांबविण्यात आली. सदर तक्रारीचे अनुषंगाने Airtel Payments Bank यांचेसोचत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नमूद फसवणूक झालेली रक्कम तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आली. Online Money Scam
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस हवालदार प्रविण आव्हाड, पोलीस अंमलदार गणेश इलग, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, पोलीस अंमलदार प्रशांत बोरकर, सोनाली मोरे, प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे. Online Money Scam