Online Fraud : ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे पडले महागात, पोलिसांचे दमदार कामगिरी
Mira Road Online Fraud News : ऑनलाइन फसवणुकीमध्ये गमावलेले 26 लाखातले अठरा लाखाहून अधिक रक्कम परत मिळवून देण्यास काशिगाव पोलिसांना यश
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात सायबर विभागात Vasai Virar Cyber Police Department ऑनलाईन फसवणुकीबाबतच्या Online Fraud तक्रारी दिवसाआड वाढत आहे. पोलिसांकडून सातत्याने ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान राहण्याकरिता अनेक जनहित कार्यक्रम घेण्यात येते तरीही लोकांची मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन फसवणूक होते. काशिगाव पोलिसांची Kashigaon Police Station यशस्वी कामगिरी मीरा रोड मध्ये दिसून आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली होती. 25 लाख हून अधिक फसवणूक झालेल्या व्यक्तीची जवळपास 18 लाख हुन अधिक रक्कम परत करण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Mira Road Cyber Crime News
संतोष कंवर यांनी शेअर मार्केटमध्ये 26 लाख वीस हजार रुपयाची ऑनलाईन गुंतवणूक केली होती. त्यांना त्या बदल्यात आर्थिक आमिष दाखविले होते. अधिक नफा मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी एवढी मोठी रक्कम त्यामध्ये गुंतवली होती स्थलांतराने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात येतात त्यांनी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सदर प्रकरणाबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात सायबर विभागाला माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2008 च्या कलम 66 (डी) 66 (सी) प्रमाणे तसेच भादवी कलम 420,34 सह गुन्हा दाखल केला होता. Mira Road Cyber Crime News
काशिगाव पोलिसांनी तसेच सायबर विभागाने घडलेल्या घटनेची पाहणी करून तक्रारदार यांच्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यातून झालेले रक्कम ज्या खातेदारात गेली आहे ती रक्कम संबंधित बँकेचे पत्र व्यवहार करून गोठवण्यात आली होती. पोलिसांनी तक्रारदार यांच्या न्यायालयाकडून रक्कम मिळवण्यासाठी काशिमिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदारांच्या फसवणुकीतील एकूण रकमेपैकी 18 लाख 55 हजार रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. Mira Road Cyber Crime News
पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत गमावलेली रक्कम तक्रारदार याला परत मिळवून देण्यास पोलिसांनी यश आले आहे.प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 01, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे . Mira Road Cyber Crime News
Web Title : “Trending Now: Police’s Successful Crackdown on Online Stock Market Fraud in Mumbai”