Online Fraud : महिलेची ऑनलाइन आर्थिक फसवणूक
Part Time Online Fraud : पार्ट टाइम जॉबच्या आमिषाला महिलेच्या बळी, दहा लाखाहून अधिक आर्थिक फसवणुकीची घटना
अंबरनाथ :- सायबर विभागामार्फत Cyber Crime Department सातत्याने जनजागृतीच्या माध्यमातून ऑनलाईन पार्ट टाइम जॉब Online Part Time Job आमिषाला बळी पडू नये असे सातत्याने आवाहन करत आहे. महिलेला टेलिग्राम च्या माध्यमातून युट्युब व्हिडिओला Telegram And Youtube Like लाईक करण्याचा पार्ट टाइम जॉबच्या आमिषाला महिलेचा बळी पडली आहे. त्या महिलेची दहा लाखाहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. Cyber Crime News
फिर्यादी महिला, (59 वर्षे) रा.सुभाषवाडी, वांद्रापाडा, अंबरनाथ पश्चिम यांना एक अनोळखी मोबाईलधारक महिला व तीन इसम यांनी टेलिग्रामवर युटयुब व्हिडीओ लाईक करण्याचा पार्ट टाईम जॉब देण्याचे सांगुन प्रीपेड टास्क केल्यास अधिक कमीशन मिळण्याचे अमिष दाखवून त्यांना एकुण 10 लाख 79 हजार 900 रूपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दराडे हे करीत आहेत. Cyber Crime News