ऑनलाइन फसवणूक ; शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक, एक कोटीहून अधिक आर्थिक फसवणूक
Navi Mumbai Police Arrested Fraudster From Surat: नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला सुरत एअरपोर्टवर अटक, दुबई वरून चालू होतं नेटवर्क
नवी मुंबई :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share Market Trading) करून ट्रेडिंग केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवून 1 कोटी 23 लाख 64 हजार 24 रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नवी मुंबई सायबर विभागाला (Navi Mumbai Cyber Department) फिर्यादी यांनी दिली होती. आरोपी हा दुबई वरून गुंतवणूकदाराकडून पैसे घेत असे तसेच मोठ्या प्रमाणावर परतावाचे आमिष दाखवित असे, आरोपी हा दुबई वरून परत येताना त्याला सुरत विमानतळावर अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai Cyber Crime News
“Dubai to Mumbai: A Global Network of Financial Fraud Exposed”
फिर्यादी यांनी एक कोटी 23 लाख 64 हजार 24 रुपयांचे आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रार नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला दिले होते पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 419, 420,34 भारतीय दंड संहिता 1860 सहकलम 66 (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2008 अन्वे आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, तसेच बँके खाते गुन्ह्यातील आरोपी कौशिक कुमार कल्याण भाई ईटालिया (गुजरात,सुरत) याला लूक आउट नोटीस जाहीर करण्यात आली होती. 26 जून रोजी आरोपी सुरत विमानतळावर येथे आल्याने इमिग्रेशन अधिकारी सुरत विमानतळ यांनी सायबर पोलीस ठाणे यांना कळवले आणि आरोपीला अटक केली. “Police Crackdown: Mumbai Scam Artist Arrested at Surat Airport” आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी सुरत पोलिसांकडून ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपासणी केली असता त्याच्या सदर गुन्ह्यातील सहभागाचा निष्पन्न पोलिसांच्या तपासात झाला आहे. Navi Mumbai Cyber Crime News
“The Cyber Scam that Shocked Mumbai: Police Investigation Underway”
आरोपीच्या विरोधात इतर ठिकाणी गुन्हे दाखल
1) चितळसर मानपाडा पो. ठाणे, ठाणे गुस्क ३११/२०२३,
2) उत्तर प्रादेशिक विभाग, सायबर पो. ठाणे मुंबई गुरक ३८/२०२४,
3) उत्तर प्रादेशिक विभाग, सायबर पो. ठाणे, मुंबई ३९/२०२४,
4) कोंढवा पो. ठाणे, पुणे शहर गुस्क ६९७/२०२४,
5) सायबर पो. ठाणे, पुणे शहर गुस्क ५१८/२०२४,
6) सायबर पो. ठाणे, नवी मुंबई गुरक २६/२०२३,
7) सायबर पो. ठाणे, नवी मुंबई गुरक २९/२०२३ तसेच
आरोपीचा महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विविध राज्यातील असे एकुण 60 सायबर तक्रारी मध्ये फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्कम भरलेल्या सर्व बँक खाते गोठविण्याबाबत तात्काळ पत्र व्यवहार करून सदर बँक खात्यांनमध्ये एकुण 43 लाख 31 हजार 667 रक्कम गोठविण्यात सायबर पोलीस ठाणे यश आले आहे.
“Justice Served: Mumbai Cyber Fraudster Arrested at Surat Airport”
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, सायबर धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजानन कदम, पोलीस निरीक्षक विशाल पादीर, पोलीस उपनिरीक्षक, रोहित बंडगर, पोलीस उपनिरीक्षक सचिन गिड्डे, पोलीस हवालदार विजय आयरे, पोलीस शिपाई रविराज कांबळे, भाऊसाहेब फटांगरे यांनी उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम करित आहेत. Navi Mumbai Cyber Crime News