ऑनलाइन फसवणूक ; फेसबुकवर शेअर मार्केट ट्रेडिंगच्या लिंकवर केले क्लिक आणि बसला लाखो रुपयांचा फटका
Online Trading Scam : ठाण्यामधील कोलशेत येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची ऑनलाइन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे :- ठाणे शहरामध्ये Thane Trading Scam कोलशेत येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञाताने ऑनलाइन लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक वर ऑनलाईन ट्रेडिंग संदर्भात लिंक ओपन केली 5 लाख 49 हजार 567 रुपये गमावले आहेत. वैभव तात्यासाहेब कांगणे (44 वर्षे) असे या व्यक्तीचे नाव आहे. शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याकरिता त्यांना whatsapp ग्रुप वर ऍड करून अधिकचा नफा मिळेल याच आमिषाला बळी पडल्याने कांगणे यांची मोठी फसवणूक झाली. Thane Latest Cyber Crime News
कांगणे हे ठाण्यातील लोढा अमारा कोलशेत येथील रहिवासी असणारे आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात Kapoorbawadi police station तक्रार दाखल केली. फवसवणुकीची ही घटना 29 मे ते 14 जुलै या कालावधीत घडल्याचे कांगणे यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. फेसबुकचा वापर करत असताना कांगणे यांना शेअर मार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली. त्या लिंकवर क्लिक केले असता व्हॉटसअॅप ग्रुपवर जॉइन करा, असा मेसेज मिळाला. ग्रुप जॉइन केल्यानंतर तुमचे पैसे गुंतवून जादा परतावा मिळवून देऊ असं आमिष दाखवण्यात आले. जादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडत कांगणे यांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली. 5 लाख 49 हजार 564 रुपये जमा केले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क),(ड) भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस के महाडीक करीत आहे. Thane Latest Cyber Crime News