क्राईम न्यूजठाणे
Trending

ऑनलाइन फसवणूक ; अमितचे “शेअर्स” सायबर भामट्यामुळे घसरले!

Thane Online Trading Fraud News : ऑनलाइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल अशा अमिषाला बळी!

ठाणे :- गुंतवणुकीसाठी शेअर ट्रेडिंगकडे Thane Share Market Trading जाणाऱ्यांचा ओढा वाढला. याच चढाओढीत सायबर भामट्यांच्या Thane Cyber Crime जाळ्यात अडकणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. दिवसाआड शेअर, ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधींची लूट होत असताना सायबर भामट्यांनी एसबीआय बँकेच्या नावाखाली शेअर ट्रेडिंगचे जाळे SBI Bank Shares Fraud पसरविल्याने चिंतेत भर पडली आहे. जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचे. ठाण्यातील अमित नावाच्या व्यक्तीचे तब्बल 27 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. Thane Latest Crime News

नौपाडा पोलिसांनी Nawpada Police Station दिलेल्या माहितीनुसार जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान अमित द्वारकानाथ देशमुख (45 वय ,रा. चंदनवाडी ठाणे पश्चिम) यांना कॉल येऊन Mravel investments,SBI, Wells Fargo VIP group 58 या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल असे आमिष दाखविले होते. अमित यांनी आरोपी याच्या आमिषाला बळी पडत 27 लाख 52 हजार रुपयांची ऑनलाईन गुंतवणूक केली होती. परंतु त्या गुंतवणुकीतील पैशापैकी कोणताही परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात. अमित यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम 318(4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन 2000 चे कलम 66 (ड), 66 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहे. Thane Latest Crime News


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0